सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४
14 October 2024

ताण-तणावांवरचा ‘आनंदस्पर्श’

‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे ध्येयवाक्य घेऊन ठाण्यात आयपीएच नावाची संस्था गेली २० वर्षे काम करत आहे. डॉ. आनंद नाडकर्णी या नितळ मनाच्या डॉक्टरने ही संस्था व हा परिवार उभा केलाय. आज गडकरी रंगायतनमध्ये त्या निमित्ताने विविध उपक्रम होत आहेत. त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

आमीर खान ‘तारे जमीं पर’ सिनेमात काय करतो? हा प्रश्न जर अचानक कोणाला विचारला तर कोणी सांगेल तो अभ्यासात गती नसलेल्या मुलामधील सुप्त गूण शोधून त्याला यशस्वी होण्याची किल्ली देतोय, तर कोणी सांगेल तो आई-बाबांना चांगले पालक कसे व्हायचे हे सांगतोय, कोणी म्हणोल तो शिक्षण पध्दतीवर भाष्य करतोय, तर कोणी सांगेल तो शिक्षक मुलांमधलं नातं समजावून सांगतोय.. थोडक्यात काय तर अमीरखान हा रुपेरी पडद्यावर दिसतो आणि ग्लॅमरमुळे तो जे करतोय ते पहिल्यांदा अनुभवतोय असं म्हणत आपण त्याचं कौतुक करु लागतो. निर्जीव पडद्यावर आमीरखानला पहातानाही आपण डोळ्यांच्या कडा हळूच टिपतो.. मात्र वास्तवातही एक आमीर खान आहे जो अशी सगळी कामं गेल्या २० वर्षापासून करतोय.. अनेकांच्या डोळ्यातले अश्रू पुसत चेह:यावर हसू फुलवतोय.. ठाण्यातल्या गजबजलेल्या रोडवरील इमारतीत बसून एक अवलिया आपल्याच आनंदात, तल्लीन होत दुस:यांना ‘आनंदस्पर्श’ देतोय..

डॉ. आनंद नाडकर्णी त्या अवलियाचं नाव. पाहिल्याबरोबर प्रेमात पडावं असं व्यक्तीमत्व. खळाळून हसणं म्हणजे काय किंवा निरागसतेची व्याख्या काय असे विचारणा:यांना हा माणूस दाखवावा. हसत खेळत, न दुखावता हा माणूस वेडय़ांना शहाणं करण्याचं काम करतो हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. नावाप्रमाणो आनंद वाटण्याचं काम करताना; लोक खूष झाले, मनापासून हसले की या माणसाला भलीमोठी फी मिळाल्याचा आनंद होतो. एमबीबीएसचं शिक्षण घेऊन ठाण्यात डॉक्टरांनी मनोविकारशा या त्यांच्या ज्ञानशाखेचे काम काम सुरु केले. त्यावेळी त्यांनी आयपीएच (इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) नावाची संस्था सुरु केली. ते करताना त्यांना शिक्षण क्षेत्रतील एका मान्यवराने ‘अनफोकस्ड वर्क’ असा शेरा दिला. तर काही परदेशी तज्ञांनी ‘मोस्ट कॉम्प्रेहेन्सीव्ह मेंटल हेल्थ इन्स्टिटय़ूट फॉर ए डेव्हलोपिंग कंट्री’ (मानसिक आरोग्य क्षेत्रतला विकसनशिल देशातला अत्यंत व्यापक उपक्रम) असा शेरा दिला. हा किस्सा सांगताना डॉक्टर एकाला दोष देत दुस:याचे कौतुक करत नाहीत. उलट सर्वसमावेशक (कॉम्पेहेन्सीव्ह) आणि अकेंद्रीत (अनफोकस्ड) हे दोन शब्द एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतात असं सांगून आपलं काम करत जातात..

याच भूमिकेतून गेली वीस वर्षे काम करणा:या या अवलियाकडे कोण कोण उपचारासाठी येतं हे पाहणं देखील अभ्यासाचा विषय ठरावा. एखादी हार्डकोअर सायकिऍट्रिक आजाराची व्यक्ती येते, तर कॉनमवेल्थ गेममध्ये पदक मिळविणारा ऍथलिट व्यसनमुक्तीसाठीही येतो. मधेच दहावीनंतरच्या करीयरबद्दल सल्ला घ्यायला आलेला विद्यार्थी पालकांच्या अपेक्षांच्या ओङयासह समोर येऊन बसतो तर मधेच फिट्सचा आजार असणारा बच्चूही येतो, त्यानंतर एखाद्या मोठय़ा कंपनीचा उद्योजक तणावमुक्तीसाठी येऊन जातो तर त्यापाठोपाठ वृध्दवयातल्या प्रश्नांचे गाठोडे सांभाळत; एखादी आजी येऊन बसते, तर स्वत संगीत कंपोज करणारा एखादा तरुणही; मानसिक ताणाच्या सुरावटी कोणत्या रागात गायच्या हे विचारायला येतो. या सगळ्यांना हा अवलिया ‘आनंदस्पर्शी’ डॉक्टर मानसिक आजार, समस्या आणि विकास या तीन्ही टप्प्यांवर दिवसाचे दहा तास बोलत जातो.. मार्ग दाखवत जातो..

जागतिकीककरणाने स्पर्धा आणि तीव्र स्पर्धा हे दोन शब्द आपल्याला दिले. त्यातून निर्माण होणारे ताणतणाव असह्य होत असताना सगळीकडे दिसतात. कधी कधी हे तणाव इतक्या टोकाला जातात की त्यातून मानसिक संतूलन बिघडण्याची शक्यता जास्त होते. नकळत लोक मनोरुग्णाच्या व्याख्येकडे वळू लागतात. दिवस उजाडल्यापासून ते मावळेर्पयत माणसं एका अदृष्य तणावाखाली वावरताना दिसतात. सततच्या तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठीचे मार्गही ते शोधायला लागतात. या तणावातून कोणाचीही सुटका झालेली नाही. शालेय विद्याथ्र्यापासून ते राजकारण्यांर्पयत. सगळेच त्यात अडकले आहेत. या तणावमुक्तीसाठी प्रत्येकजण एखाद्या बुवाला, बाबाला किंवा महाराजाला शरण जाताना दिसतो. गेल्या काही वर्षात देशात व राज्यात देव दर्शनासाठी जाणा:यांची किंवा एखाद्या साधू महाराजाला शरण जाणा:यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. अशावेळी या तणावाचे अभ्यासपूर्ण विेषण करुन मजेशीर पध्दतीने उपाय सांगणारे दूर्देवाने आपल्याला दिसत नाहीत. हीच कमी डॉ. आनंद नाडकर्णी आयपीएच्या माध्यमातून दूर करत आहेत. समोर येणा:यांना, त्यांच्याच भाषेत, कोणताही आवेश न आणता मजेशीर पध्दतीने मानसिक आजारावरचे उपचार सांगण्याचे काम निरलस वृत्तीने डॉक्टर करत आले आहेत.

स्क्रीझोफेनियाच्या रुग्णांना सांभाळण्याचं काम म्हणजे ज्या घरात असे रुग्ण आहेत त्यांना खुल्या कारागृहाचीच शिक्षा. पण डॉक्टरांनी या रुग्णांना उभं करण्याचं जे काम केलयं ते असं शब्दात मांडण्यासारखं नाहीच. एकीकडे व्यक्तीगत पातळीवर रुग्णांना तपासत असताना समूहासाठी त्यांनी आयपीएचच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. आज महाराष्ट्रासाठी त्यांच्या या विविध उपक्रमांनी दिलेले योगदान शब्दातीत आहे. शेतक:यांच्या आत्महत्या अजूनही सरकार थांबवू शकलेले नाही मात्र आयपीएच मध्ये असणा:या हेल्पलाईनमुळे अनेक आत्महत्या थांबल्याचे गेल्या दहा वर्षातले अचूक रेकॉर्ड साक्ष आहे. शालेय मुलांनी कोणते करीयर निवडावे यासाठीचा ‘वेध’ नावाचा उपक्रम तर डॉ. नाडकर्णी यांच्या कल्पकतेचा परिपाक म्हणावा लागेल. अमिताभ बच्चन पासून ते वसंत गोवारीकरांर्पयतचे अनेक दिग्गज त्यांनी दहा-दहा हजार मुलांसमोर आणले आणि त्यांच्या घडण्याचा प्रवास मुलांना ऐकवलेला आहे. आज वेध उपक्रम नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद अशा अनेक शहरातून होतोय. वेगवेगळ्या क्षेत्रत काम करणारी अनेक माणसं शोधण्याचं, त्यांचे काम मुलांसमोर आणून तूम्ही देखील असं होऊ शकता हे सांगणारं वर्कशॉप हा हसत खेळत शिक्षणाचा अनोखा आणि एकमेव प्रयोग म्हणावा लागेल.

याशिवाय कुमारवयीन मुलांना जीवन शिक्षण कार्यक्रम सांगणारा ‘जिज्ञासा’, दूरध्वनी सुसंवादचा ‘मैत्र’, मानसिक आरोग्याच्या प्रबोधनाचा ‘मनोविकास’, गुणवान मुलांचे संगोपन कसे करायचे याचे शिक्षकांना प्रशिक्षण देणारा ‘शिक्षक प्रबोधिनी’, स्क्रीझोफेनिया आजाराने ग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांसाठी चालविला जाणारा ‘त्रिदल’, खेळाडूंना मानसिक स्थैर्याचे प्रशिक्षण देणारा ‘मिशन एक्सलन्स’ अशा अनेक उपक्रमांना आज आयपीएच मध्ये आकार आला आहे.

देशभरातल्या ४० विविध कंपन्यांना मानसिक ताण तणावातून मुक्ती मिळविण्याचे प्रशिक्षण देत त्यातून मिळालेल्या पैशांमधून हे सगळे उपक्रम चालविण्याची चिकाटी म्हणूनच वेगळी ठरते. सामाजिक संस्था चालवताना अनेकदा त्या सरकारी मदतीवर किंवा आंतरराष्ट्रीय फंडींगवर चालविल्या जातात. मात्र आयपीएचने २० वर्षाच्या काळात अशी रुपयाची देखील कोणती मदत घेतलेली नाही. त्यांच्या कामाचे हे वेगळेपण शोधूनही सापडणार नाही.

आज आयपीएचची गुडी २० वर्षाची झालीय. त्याचा सोहळा ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये होतोय. त्याचवेळी ‘शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट शोध मानसिक आरोग्याचा’ आणि ‘मनोगती’ या डॉ. नाडकर्णी यांनी लिहीलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी डॉ. नाडकर्णी यांना मुंबईत राजभवनावर भेटीला बोलावले होते त्यावेळी त्यांनी सायकिऍट्रिस्ट आणि सायकॉलॉजीस्ट यात नेमका फरक काय? असा सवाल केला तेव्हा डॉक्टरांनी ‘सायकिऍट्रिस्ट हा मेडीकल डॉक्टर असतो तर सायकॉलॉजीस्ट हा आर्टस् फॅकल्टी घेऊन आलेला..’ असं उत्तर देणं सुरु केलं त्यावेळी त्यांना मधेच थांबवत कलामांनी मला तो फरक माहिती आहे, ‘टेल मी दि फंक्शनल डिफरन्स..’ असा सवाल केला होता. डॉक्टरांनी हा फरक सांगण्यासाठी आयपीएच्या वेगवेगळ्या उपक्रमांना महामहिम कलामांपुढे ठेवले होते. त्यानंतर त्यांनी ‘कीप इट अप.. यू आर डूईंग गूड वर्क..’ अशी शाब्बासकीची थाप पाठीवर दिली होती. मात्र हा अवलिया डॉक्टर त्या राजभवनातून बाहेर पडताना ती शाब्बासकी तिथल्याच हिरवळीवर सोडून आला. त्या भेटीचा साधा फोटोही त्याने घेतला नाही. दुस:या एखाद्या संस्थेला ही संधी मिळाली असती तर..

”सामाजिक कार्य आणि व्यक्तीगत जीवन यात ओढाताण होते मात्र व्यक्तिगत आध्यात्मिक चिंतन आणि सामाजिक कर्मयोग हे दोन्ही एकच मानले पाहिजेत, म्हणजे आपली कार्ये प्राणवान राहतील” विनोबांच्या या शिकवणीवर विश्वास ठेवून डॉक्टर गेली २० वर्षे ‘आनंदस्पर्श’ करत भ्रमंती करतायतं.. त्यांना शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *