सोमवार, २९ मे २०२३
29 May 2023

सुजीत कुमार सिंग / सीएमडी श्रेया फार्मा एका जीद्दीची कहाणी

बिहार मधील राघोपूर जिल्ह्यातील फत्तेपुर हा राबडीदेवीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याच ठिकाणी एका मुख्याध्यापकाच्या घरात जन्माला आलेला सुजीत कुमार सिंग. इतर आई-बापांपप्रमाणे त्याच्या वडीलांचे स्वप्न होते, आपला मुलाने डॉक्टर व्हावे. त्यासाठी बारावीनंतर त्यांनी त्याला स्टूडंट एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत मास्कोला पाठविले. तेथे जाऊन त्याने तीन वर्षे प्रचंड मेहनत घेतली. साधारणपणे १९८८ ते १९९० चा तो काळ होता. त्याचवेळी रशियात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सोव्हियत युनियनचे तुकडे झाले. मास्को वेगळा झाला. मागणी आणि पुरवठय़ात मोठी तफावत निर्माण झाली. त्याचवेळी सुजितकुमारला वाटू लागले की शिक्षण सोडून द्यावे आणि व्यवसाय करावा. शिक्षणासाठी पुरेसा पैसा नव्हता तर व्यवसायासाठी कोठून येणार ? घरच्यांना सांगायचीही खोटी. वडील म्हणाले असते तुला शिकायला पाठवले की धंदा करायला. आपल्या मुलाने शिकून डॉक्टर व्हावे ही त्यांची इच्छा. शेवटी वडिलांना काहीही न सांगता त्याने व्यवसाय करायचे ठरविले. त्यावेळी मॉस्कोत कॅडिलाचे सीईओ इंद्रवदन मोदी यांना सुजीत भेटला आणि त्यांच्या कंपनीची औषधे रशियात विकायची परवानगी त्याने मिळविली. त्या परवानगीने त्याच्यातील डॉक्टर संपवून एका यशस्वी उद्योजकाची बीजं त्यात रोवली गेली. सुरु झालेल्या प्रवासात रॅनबॅक्सी, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज्, जेबी केमीकल्स यासारख्या भारतीय कंपन्यांसोबतच जीएसके, फायझर असे आंतररराष्ट्रीय बॅ्रंडस् सुजीतचे सहप्रवासी झाले.

त्याहीआधी म्हणजे औषधी व्यवसायाचे वितरण करण्याच्या आधी एक व्यवसाय सुजीतनी करुन पाहिला होता. पण त्यात आलेल्या अपयशाला तो आपल्या आयुष्याचा टर्निगपॉईंट मानतो. मॉस्कोत थंडी खूप असायची. भारतात लोकरीचे कपडे मोठय़ा प्रमाणावर बनायचे. तिथल्या लोकांनी सांगितले की तू कपडय़ांचा व्यवसाय कर. दहा ठिकाणाहून पैसे गोळा करीत सुजीतने उबदार कपडे मागविले पण त्याच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, विंटर का सामान समर में आ गया.. शेवटी कसेबसे ते कपडे विकले गेले. कोणाला रंग आवडत नव्हता तर कोणाला साईज येत नव्हती.. जर ते कपडे विंटरमध्येच आले असते तर .. या प्रश्नावर सुजीत मनापासून हसतो आणि म्हणतो, तो फिर में कपडे बेचनेवाला बन जाता.. लेकीन ऐसा नही होना था.. पहेलेही धंदेमें उंगलिया जल गयी, तो कपडेके धंदे का नाम तक बादमें नही निकाला मैने.. आणि कपडे वेळेवर येत नाहीत हे लक्षात आल्यावर मी औषधी विकायच्या धंद्याची सुरुवात करुन टाकली होती.. गप्प नव्हतोच मी.. तो पुढे सांगत असतो.

एखाद्या सिनेमाची कथा सांगावी तसे सुजीत स्वत विषयी सांगत असतो. आपल्या श्रेया ग्रुप या कंपनीला श्रेया हे नाव कसे दिले, घरात या नावाचे कोणी आहे का, या प्रश्नावरही त्याचे उत्तर गमतीशिर असते. दिल्लीत एक ओळखीचे मित्र होते. ते त्याला एअरपोर्टवर भेटले. त्यांची मुलगी श्रेया. छोटीशी, दिसायला गोड. तीचे नाव सुजीतच्या डोक्यात बसलेले. त्यामुळे मॉस्कोत जेंव्हा कंपनीच्या नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला त्यावेळी त्यावर त्याने श्रेया हे नाव बिनधास्तपणे टाकून दिले. आज अडीच ते तीन हजार कोटीचा श्रेया ग्रुप, जगातल्या २० नामांकित कंपन्यांची साडेचार हजार औषधं वितरीत करीत दिमाखात उभायं, सुजीतच्या घरात आजही श्रेया हे नाव कोणाचेही नाही.. नावात काय आहे हे शेक्सपीयरने सांगितलेले केवळ सुजीतनेच वाचलेले दिसते..

उद्योग म्हणजे काय, तो कशाशी खातात हे देखील माहिती नसणारा सुजीतकुमार आज त्याच्याकडे येणाऱ्यांना कौनसे बिझनेस हाऊससे आप तालुक रखते हो.. असे विचारतो. पण त्याची सुरुवात अतीशय खडतर झालेली. सगळा प्रवास अगदीच दगडं-धोंडय़ांचा.. त्याचे ऑफीस उघडले. त्याला व्यवसाय देणारे फॅक्सवर ऑर्डर पाठवायचे. एकदा एका कंपनीने ऑर्डर फॅक्स केली. पण ती त्याला मिळाली नाही. कारण फॅक्समध्ये रोलच नव्हता आणि रोलसाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते. पण हे लोकांना सांगणार तरी कसे ? हमारे पास रोल नही है.. और वो कही मिल नही रहा.. असे त्याने सांगितले पण समोरचाही वस्ताद. त्याने सांगितले आमच्या बिल्डींगच्या खालीच तर रोल मिळतो.. आणि त्या दिवशीच्या जेवणाच्या पैशातून त्याने रोल खरेदी केला.. फॅक्सवर ऑर्डर आली आणि सुजीत त्या दिवशी पाणी पिऊन झोपी गेला..

जेवणाच्या देखील त्याच्या कथाच आहेत. आईने भारतातून लसणाचे लोणचे पाठविले. तिकडे थंडी खूप असते म्हणून. पण खायला पैसे पुरायचे नाहीत म्हणून त्याने तीन महिने ब्रेड आणि लसणाचे लोणचे यावर काढले. त्याचा परिणाम त्याच्या शरिरावर झाला आणि उष्णतेमुळे अंगावर सगळ्या फोड येऊ लागले, पण त्याचा खडतर प्रवास सुरुच होता..

त्यातून हळूहळू कामं मिळत गेली, चार पैसे शिलकी राहू लागले आणि ‘श्रेया’ मॉस्कोमध्ये यशोशिखरावर पोहोचली.. अगदी थोडय़ा कालावधीत रशियाचे क्षेत्र काबीज करताना सुजितला आपल्या मातृभूमीची ओढ तेथे राहू देत देईना.. अखेर २००१ साली टाटा ग्रुपच्या रॅलीज फार्माला जवळपास ४९ कोटी रुपयांना विकत घेत त्याने भारतीय औद्योगीक क्षेत्रत प्रवेश केला. या टेकओव्हरमुळे त्यांना भारतातील औरंगाबाद शहरात तर ¨झम्बाब्वेच्या हरारे शहरात मॅन्यूफॅक्चरिंग बेस मिळाला. पण ‘श्रेया’ची भूक शमली नव्हती. 2क्क्3 साली इंदोरच्या प्लेथिको फार्माला ८५ कोटीला विकत घेऊन ‘श्रेया’ ग्रुपने भारतीय औषधी उद्योगात आपले पाय भक्कमपणे रोवले. त्यातूनच भारतीय भावंडाचा म्हणजे ‘श्रेया लाईफ सायन्स’चा जन्म भारतात झाला.

आपल्या कामावर प्रचंड श्रध्दा आणि २४ तास मेहनत याच्या जोरावर सुजीतकुमारच्या कंपनीने २००६/०७ या वर्षात ३५६ कोटीची उलाढाल केली. त्यापैकी जवळपास १६० कोटी हे केवळ औषधी व्यवसायातून त्यांनी मिळविले आहेत.

भारतीय उद्योगात औषधीशाळाच्या वाढीचा दर १८ टक्के वार्षिक असा असतानाच्या काळात ‘श्रेया’ने या क्षेत्रत प्रवेश केलायं. आज भारतातील प्लान्टस् मध्ये इन्सुलिन क्रिस्टलच्या स्वरुपात बनविले जाते, तर औरंगाबादमधील प्लांटमध्ये २०० मिलीयन गोळ्या व १० मिलीयन कॅप्सूल निर्माण होतात व हे सर्व परदेशात पाठविले जाते त्यामुळेच डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने दोन स्टारच्या एक्सपोर्ट हाऊसचा दर्जा ‘श्रेया’ला दिलायं. आता त्यांना युकेच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी ऑथेरिटीची मान्यता हवीय.

असे असले तरी गप्पा मारताना सुजितकुमारना त्यांच्या आवडीच्या चित्रपटाविषयी विचारले तर त्यांचा जवळचा मित्र हेमंत लाड त्यांना शत्रुघ्न सिन्हावरुन चिडवतो. आजभी तु वो किस्सा नही भुलता अशी आठवण हेमंतने करुन दिली की सुजितदेखील तितक्याच सहजतेने त्याच्या हातातील सिगारेटचे पाकीट फेकून मारत त्याला दाद देतो. अत्यंत नितळ स्वभावाचा हा ३४ वर्षे वयाचा तरुण उद्योजक 5क् वर्षे तरी आपल्याला कोणी स्पर्धक येऊ नये यासाठी काम करतोय, पण ते करताना कोणतीही लांडीलबाडी नाही, किंवा बनवेगिरी नाही.. इमानदारी, मेहनत, लगन, कनेक्शन्स् और व्यवहार इनको समेटकर मैं काम करता हूं असे तो सांगतो तेव्हा ते कुठेही फिल्मी वाटत नाही हीच त्याच्या कामाची पावती म्हणायला काय हरकत आहे..

शाळेत असताना साधारणपणो १६-१७ वर्षे वयाच्या आपल्या चार पाच मित्रंसोबत तो गावात नदीकिना:यावर दगडं मारत बसायचा. त्यावेळी कोणीतरी सांगितले होते, ‘मर्सिडीड’ नावाची मोठी कार असते म्हणो.. त्यावेळी त्या गाडीला ‘मर्सिडीज्’ म्हणतात हे ही त्यांना ठावूक नव्हते. आज तो स्वतच्या बीएमडब्ल्यू गाडीतून फिरतोय.. त्याचे वय आहे ३४ वर्षे !

दहावीचा निकाल लागला. तो आपल्या मित्रंसोबत मुंबई पहायला आला. १९८८ साली मुंबईत आल्यानंतर थेट शत्रुघ्न सिन्हाच्या दारासमोर जाऊन त्याची एक झलक दिसावी म्हणून तो दिवसभर उभा राहिला. मुंबईची ती त्याची पहिली भेट. आज २००७ साल आहे. मुंबईत शत्रुघ्न सिन्हाच्या घरासमोर त्याचे घर आहे. दोघे चांगले मित्र आहेत.. त्याचे वय आहे ३४ वर्षे !

मास्कोमध्ये एका छोटय़ाश्या खोलीत त्याने त्याचे ऑफीस सुरु केले. ज्या खोलीत तो रहायचा त्याच ठिकाणी. आपल्या हाताखाली काम करणा:यांना आपण येथे रहातो हे कळायला नको म्हणून तो सकाळी साडेसातला खोलीच्या बाहेर पडायचा. साडेनऊला सगळ्यांसोबत यायचा आणि ऑफीस उघडायचा. आज त्याच मास्कोमध्ये भव्य सातमजली इमारत त्याच्या मालकीची आहे.. त्याचे वय आहे ३४ वर्षे ! त्याला स्वतच्या व्यवसायाला असा काही आकार द्यायचा की येणा:या पन्नास वर्षात त्याची बरोबरी करु शकेल असा कोणी येणार नाही आणि तोर्पयत सगळे त्याचे नाव घेतील.. त्याचे वय आहे ३४ वर्षे ! एखादा नवा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सुजीतची एक अफलातून केमिस्ट्री आहे. स्वतजवळ जे काही आहे ते सगळे पणाला लावायचे. जवळपास स्वत संपूनच जायचे.. आणि अथक श्रमाच्या जोरावर पुन्हा सगळे नव्याने मिळवायचे.. पुन्हा नवा डाव मांडायचा.. लहानपणी फिनिक्स पक्षाची गोष्ट केवळ त्यानेच वाचलेली असावी जणू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *