रविवार, ६ जुलै २०२५
6 July 2025

दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?

अतुल कुलकर्णी/ अधून मधून 

आदित्य आणि अमित

नमस्कार,

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे १९ वर्षांनंतर एकत्र आले. मराठी माणसांनी त्याचे जोरदार स्वागत केले. मात्र आपण दोघे किती वर्षांनी एकत्र आलात…? ज्या पद्धतीने तुम्ही दोघे एकमेकांच्या खांद्यामध्ये हात टाकून व्यासपीठावर आलात, ते पाहून दोन जिवलग मित्र एकत्र येत असल्याचा भास अनेकांना झाला. गेल्या कित्येक वर्षात आपण एकमेकांना भेटला नाहीत. एकमेकांशी बोलला नाहीत, हे तिसऱ्या माणसाला सांगूनही खरे वाटणार नाही इतक्या सहजतेने आपण आलात. एक तर आपण उत्तम अॅक्टर आहात किंवा आपण गिले शिकवे विसरून एकत्र आलात हे सांगण्याचा प्रयत्न करत होतात. काही असो; आपण दोघे ज्या पद्धतीने फोटोत एकत्र दिसलात, तो फोटो प्रत्येक मराठी माणसाला आवडला. उद्धव राज सहकुटुंब एका फोटोत दिसले. उद्धव यांच्या उजव्या हाताला अमित, तर राज यांच्या डाव्या हाताला आदित्य हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात कायम नोंदला गेला आहे. पण खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. हा फोटो एकदाच निघाला. पुढे अशा फोटोची संधीच मिळाली नाही असे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणू द्यायचे की काल निघालेला फोटो वारंवार निघत गेल्यामुळे याचे महत्त्व संपले असे घडू द्यायचे, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे.

मराठी माणूस भाबडा असतो. तो इतिहासावर, लोकांच्या चांगुलपणावर जिवापाड प्रेम करतो. बऱ्याचदा अशा प्रेमात तो फसतो देखील. जे दिसते तसे नसते हे कळाल्यानंतर त्याचा भ्रमनिरास होतो. तसे झाले तर तोच मराठी माणूस नंतर कोणावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे जमलेल्या तमाम मराठी बंधू-भगिनींचा भ्रमनिरास होऊ द्यायचा की नाही, हे तुम्हा दोघांच्या हातात आहे. कोळसा उगाळावा तेवढा काळा असतो. आपल्या दोघांचे वडील कशामुळे वेगवेगळे झाले आणि कशामुळे एकत्र आले हे अन्य कोणाहीपेक्षा त्या दोघांना एकत्र आले हे अन्य कोणाहीपेक्षा त्या दोघांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तो इतिहास उगळण्यात काहीही अर्थ नाही.

आजपर्यंतची राज ठाकरे यांची वेगवेगळी विधाने तपासून बघितली तर त्यांनी कुठेही आम्ही एकत्र येणार आहोत, किंवा आम्ही दोघे एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाऊ असे एकदाही स्वतःहून सांगितलेले नाही. उलट, “आमच्यातले वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे फार कठीण नाही. विषय फक्त इच्छेचा आहे. समोरच्याची इच्छा आहे की नाही हे जास्त महत्त्वाचे आहे”, असेच सांगितले होते. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतही, “जगातले दुश्मन एकत्र येतात. मग आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर व्हायला हवी. आम्ही दोघे एकत्र येऊ नये असे आतल्याच काही लोकांना वाटते”, असेही सांगितले होते. एकमेकांविषयीचे हे सगळे बोलणे विसरुन आज दोन भाऊ एका व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसले. त्यांनी नवी सुरुवात करण्याचे ठरवले आहे.

पण खरे धोके आता सुरू होतील. दोन ठाकरे एकत्र येऊनही मुंबई महानगरपालिकेत जर भाजपची सत्ता आली तर ठाकरे ब्रँडचे काय होणार? हा पहिला प्रश्न निर्माण होईल. उद्धव यांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे ‘कटेंगे तो बटेंगे’ या विधानानुसार मराठी मतं जर वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली तर काय? हा दुसरा प्रश्न निर्माण होईल. दोन ठाकरे एकत्र येणं ही महाराष्ट्रातल्या मराठीप्रेमींना आनंद देणारी गोष्ट आहे. हा मराठी एकोपा मतदानाच्या रूपाने दोन ठाकरेंच्या बाजूने वळवणे ठाकरेंच्या बाजूने वळवणे मात्र तितकेच कष्टदायी काम आहे. काल झालेल्या सभेत ‘मराठी हाच अजेंडा असेल’ असे राज यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी भाषण केले. त्यांनी भाषणात राजकारण आणले नाही. तुम्ही दोन भाऊ आता एकमेकांच्या हातात हात घालून समोर आला आहात. तेव्हा या पुढच्या चर्चेची सुरुवात तुम्ही आपापसात आला आहात. तेव्हा या पुढच्या चर्चेची सुरुवात तुम्ही आपापसात संवाद वाढवून सुरू करायला हवी.

शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीत जाताना उद्धव ठाकरे यांनी कधी कोणाकडे दूत पाठवले नव्हते. मेसेजही दिले नव्हते. ते स्वतः शरद पवार यांच्याशी बोलले. त्यांना भेटले. तिथून त्यांच्या संवादांना सुरुवात झाली होती. आता उद्धव आणि राज यांच्यातील संवादाची सुरुवात कोणी करायची..? संजय राऊत यांनीच एकमेकांना निरोप द्यायचे की तुम्ही दोन बंधू आपापल्या वडिलांना योग्य तो निरोप पोहोचविण्याचे काम करणार आहात..? त्यावर पुढची समीकरणे अवलंबून असतील. अन्यथा राज यांनी सांगितल्याप्रमाणे, “आम्ही दोघांनी एकत्र यावे यासाठी जवळच्याच काहींचा विरोध आहे” हे विधान दुर्दैवाने सत्य होईल. ते होऊ द्यायचे नसेल तर या विजयी मेळाव्याकडे नव्या राजकीय पर्वाची सुरुवात म्हणून बघावे लागेल. त्यासाठी एकमेकांचे ईगो बाजूला ठेवावे लागतील. कोणाकडे गांधीजींचे फोटो छापलेले किती कागद आहेत? निवडणुकीच्या तोंडावर कोण किती ‘गांधीदर्शन’ घडवून लोकांना आपल्यापासून फोडेल? याची चर्चा न करता, मतांचे गठ्ठ आपल्याकडे कसे वळवायचे? त्यासाठी काय करायचे? यावर काम करावे लागेल. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा..!

– तुमचाच, बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!