मंगळवार, १७ मे २०२२
17 May 2022

स्वर्गातली ‘रामलीला’

‘अण्णा’ राजघाटावर ढसा-ढसा रडले,
अन् ‘रामलीला’वर जाऊन उपोषणाला बसले..
रस्तोरस्ती पोरं-टोरं, बाया-बापडी जमली,
‘हजारें’चा एक जिथे जड झालाय तिथे,
ख रा रपपर करक्षरीश म्हणत
हजारोंनी उगवली..
स्वर्ग लोकातल्या साऱ्यांनी पृथ्वीवर जेव्हा वाकून पाहिले, त्यांना जागोजाग दिसले जथ्थे, पांढऱ्या टोप्या रंगवलेले..
पृथ्वीवरल्या माणसांची डोकी कुठल्याकुठं पार हरवलेली, ख रा रपपर करक्षरीश ची उसनी टोपी फक्त होती अडकवलेली..
ते पाहून भगवान विष्णू म्हणाले, अरे हा काय चमत्कार झाला! शंभर तोंडांचा रावण मीच तर होता मारला, मग हा सहस्त्र डोक्यांचा ‘अण्णा’ कुणी जन्माला घातला?..
त्यावर तांडवनृत्य करीत शंकर भगवान कोपून म्हणाले, लढण्याचं त्राण गमावलेली पृथ्वीवरची माणसं नपुंसक झाली,
अन् मग उसनी डोकी लावून पुरूषार्थावर वांझोटं बोलू लागली..
हे ऐकून इंद्राच्या दरबारीची अप्सरा धाय मोकलून रडली, पृथ्वीवरचे सगळेच झाले ब्रम्हचारी, मग आता माझी पत घसरली..
तिची समजूत काढता काढता सारेच देव थकले, तेवढ्यात अचानक यमानेही भोकाड पसरले.. ऊर बडवीत यम सांगे साऱ्यांना,
घटीका भरली म्हणून गेलो होतो माणसाला उचलायला, सारेच ‘अण्णा हजारे’ पाहून रेडा माझा बिथरला..
एकाच्या हाताला पकडून मी म्हणालो,
”अरे चल, पृथ्वीवरली तुझी घटीका संपली” त्यावर तो म्हणतो मलाच दरडावून,
”मी अण्णा हजारे”…. म्हणून मी दुसऱ्याकडे वळलो, तर तोही म्हणतो, ”मी अण्णा हजारे”
”देवा, युगानुयुगे माणसाला उचलायचं काम मी आजवर प्रामाणिकपणे केलं,
मात्र आता माझं खातं बदल रे बाबा, या ‘अण्णा’ने माझ्या रेड्याला पार थकवलं’..
विष्णू म्हणाला, ”च्यायला उगाच म्हणालो मी, ‘संभवामि युगे युगे’
माझ्या प्रकटण्याची वाट न पाहताच पृथ्वीवर फुटू लागलेतं ‘अवतारां’चे फुगे”,
स्वर्गातील ‘रामलिला’ पाहून जे.पी., बापू, नेहरू, बाबासाहेब विचारात पडले,
चरखा फिरवित बापू म्हणाले,”या ‘अण्णा’चं बरंय बुवा, बसल्याजागी मिडियाने टोप्या लावीत गर्दी जमवली,
मी मात्र स्वातंत्र्यासाठी उघड्या अंगाने उगा अनवाणी पायपीट केली
मूठ उचावत गर्दीसमोर जेव्हा ‘अण्णा’म्हणाले ”ही तर दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई”,
तेव्हा उद्वेगाने म्हणाले जे.पी., ”अरे मग आम्ही आणीबाणीत उगा झक मारली”..
पुस्तकांच्या गराड्यात वाचनमग्न बाबासाहेबही मग म्हणाले उद्वेगाने, ”तर्कविसंगत बडबडीतून विधेयके बनवणऱ्या भारतभूमीत उगाच इतका अभ्यास करून मी ‘संविधान’बनविले”
तेवढ्यात एक पृथ्वीवरला कुठल्यातरी वाहिनीचा दूत आला स्वर्गात,
साऱ्यांना पाहून म्हणाला, अरेच्या ‘अण्णा’ च्या टोप्या नाहीत तुमच्या डोक्यात?
म्हणजे नक्कीच तुम्ही सारेच आहात भ्रष्ट,
नाहीतर म्हणा साऱ्यांनी ख रा रपपर करक्षरीश विष्णू , शंकर, यम, अप्सरा सारेच हतबल झाले, जे.पी., बापू, नेहरू, बाबासाहेबांनीही हात टेकले… त्या पृथ्वीरवरच्या दुताकडल्या टोप्या साऱ्यांनी मुकाट डोक्यात घातल्या,
अन् साऱ्यांनीच मग ‘मी अण्णा हजारे’ म्हणत जड उसासा टाकला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *