रविवार, २८ नोव्हेंबर २०२१
28 November 2021

अभिनंदन थोरात

महाराष्ट्रातील तरुण, अभ्यासू व धडाडीचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी औरंगाबादहून मुंबईला येऊन पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राज्यातील राजकारण्यांची व या क्षेत्रात घडणार्‍या अनेक बारीकसारीक घटनांची नोंद घेऊन त्यावर अधूनमधून नावाचे एक खुमासदार व्यंग सदर ते लोकमतमध्ये लिहीत आहेत. यात अनेक नेत्यांच्या गुणदोषांचे परखड विश्लेषण व्यंगात्मक शैलीत त्यांनी सादर केल्याने त्याची लोकप्रियता वाढली आहे. असे व्यंगात्मक लिखाण करताना कधी तोल जाऊन कडवट अर्थ निघणारे लिखाण होईल सांगता येत नाही पण सुदैवाने अतुल यांनी हे लिखाण करताना आपला समतोल भाव कायम राखला हे विशेष. यातील लेख कधीही वाचले तरी परत परत वाचावेसे वाटतात यात शंका नाही.